अनेक व्हीआयपी होते हेडलीच्या हिटलिस्टवर

December 14, 2009 10:41 AM0 commentsViews: 2

14 डिसेंबर 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माईंड दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड हेडली याच्या हिट लिस्टवर अनेक महत्वाच्या व्यक्ती होत्या हे तपासात उघड झालं आहे. हेडलीच्या लिस्ट मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी अशी अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. त्यांच्या रोजच्या हालचालींवरही हेडली आणि इतर अतिरेक्यांनी लक्ष ठेवलं होतं. या व्यक्तींसह भाभा अणुसंशोधन केंद्र, शिवसेनाभवन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात मुख्यालय, पवईतली लष्करी अधिकार्‍यांची जलवायू कॉलनी, कलिनाची एनएसजी कॉलनी, दिल्लीचं नॅशनल डिफेन्स कॉलेज अशा अनेक वास्तूही लष्कर-ए-तोयबा आणि इतर अतिरेकी संघटनांच्या टार्गेटवर असल्याचं हेडलीने एफबीआयकडे कबूल केलं आहे. या कटात पाकिस्तानचे लष्करी अधिकारीही सामील असल्याचं त्याने सांगितलं आहे. हेडलीने इतर काही अतिरेक्यांसोबत भारतातल्या मुख्य ठिकाणांची पाहणी केली होती. येत्या काही वर्षांत भारतात अतिरेकी हल्ले होण्याचा इशाराही एफबीआयने दिला आहे.

close