राधे माँच्या अडचणीत वाढ, 7 जणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार

August 10, 2015 3:47 PM0 commentsViews:

radhe maa10 ऑगस्ट : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँविरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. राधे माँमुळे गुजरातमधल्या कच्छमध्ये 7 जणांनी आत्महत्या केल्याची तक्रार रमेश जोशी यांनी केली आहे.

राधे माँविरोधात आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. जोशी यांनी कांदिवली पोलीस स्टेशन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांच्या नांदेड दौर्‍यानंतर राधे माँ काल मुंबईत आली. यावेळी राधे माँच्या स्वागतासाठी तिचे समर्थक एअरपोर्टबाहेर आले होते. पोलिसांसमोर हजर राहण्याचं समन्स तिला बजावण्यात आलं.

राधे माँविरोधात निक्की गुप्ता या महिलेनं हुंड्यासाठी छळ आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केलीये. आज (सोमवारी) राधे माँनं पत्रकार परिषद घेऊन आपण निर्दोष असल्याचा दावा केला. आपण कुठल्याही चौकशीला तयार असल्याचंही राधे माँने स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close