मी निर्दोष, कोणत्याही चौकशीसाठी तयार -राधे माँ

August 10, 2015 5:08 PM0 commentsViews:

radhe maa pc10 ऑगस्ट : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ हिनं आपल्यावरचे सर्व आरोप धुडकावून लावलेत. आज (सोमवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राधे माँने आपण निर्दोष असल्याचा दावा केला. आपण सीबीआय चौकशीला तयार असल्याचंही तिनं सांगितलं. माझा देव माझ्यासोबत आहे आणि नेहमी सत्याचाच विजय होतो, असंही राधे माँ म्हणाली. काही जण आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिनं केला.

स्वता:ला देवीचा अवतार समजणार्‍या राधे माँविरोधात तिच्याच एका भक्ताने निक्की गुप्ता यांनी हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. राधे माँविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राधे माँचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, राधे माँ आपल्या बोरिवलीतील माता की चौकी दरबारात लपून बसली होती. पोलीस राधे माँविरोधात लूकआऊट नोटीस जारी करणार होती. पण ही नोटीस टळली. राधे माँ अचानक औरंगाबादेत अवतरली. औरंगाबादमधून राधे माँ नांदेडला गेली. तिथे तिने गुरुद्वारा इथं जाऊन माथा टेकला. त्यानंतर रविवारी राधे माँने मुंबई गाठली. आज पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपचं तिने खंडन केलं. मी कोणताही गुन्हा केला नाही. मी निर्दोष आहे. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण काहीही असलं तरी सत्याचाच विजय होत असतो आणि माझा देव माझ्यासोबत आहे असं राधे माँनी सांगितलं. तसंच आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे असंही राधे माँने स्पष्ट केलं.

दरम्यान, राधे माँविरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आलीय. राधे माँमुळे गुजरातमधल्या कच्छमध्ये 7 जणांनी आत्महत्या केल्याची तक्रार रमेश जोशी यांनी केलीय. त्यांनी कांदिवली पोलीस स्टेशन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार केलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close