लोकलमध्ये बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला अटक

August 10, 2015 5:30 PM0 commentsViews:

local rape case310 ऑगस्ट : धावत्या लोकलमध्ये बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी यश आलंय. या तरुणाला राखीव पोलीस दल (आरपीएफ)ने दोनच दिवसांत अटक केलीये.

शुक्रवारी रात्री मालाडहून चर्चगेटकडे जाणारी लोकल चर्नीरोड स्टेशनवर पोहचली तेव्हा हा तरूण महिला डब्यात चढला होता. डब्यात एका तरुणीला एकटं पाहुन त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला त्यामुळे या तरुणाने पळ काढला होता. हा तरुण चर्नी रोड स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे शोध सुरू केला. अखेर दोन दिवसांत आरपीएफ पोलिसांनी या तरुणाला अटक केलीये. या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close