मुंबईत ‘छमछम’ सुरूच !

August 10, 2015 6:31 PM0 commentsViews:

dadar dance baar10 ऑगस्ट : राज्यात अजूनही राजरोसपणे डान्स बार सुरू आहेत. आयबीएन लोकमतच्या हाती या ‘छमछम’चा पुरावा लागलाय. मुंबईतील दादरमधल्या एका प्रतिष्ठित हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे. एका सजग नागरिकाने आयबीएन लोकमतला ही दृश्यं पाठवली आहेत. या दृश्यांमध्ये डान्सबारमध्ये बारगर्ल गाण्यावर ठुमके लावत आहे. तर दौलतजादे पैसे उडवत आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी रात्री 9 ते 10 नंतर सर्रासपणे असे डान्स बार सुरू आहेत. मात्र पोलीस त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा करतायत. राज्य सरकारने अध्यादेश काढून डान्सबार बंदी कायम ठेवलीये.

आयबीएन लोकमतचे सवाल

अजूनही सुरू आहेत डान्स बार

दादरमधले हे हॉटेल कोणते?
पोलीस यांचा शोध घेतील का?
डान्स बारला कुणाचा आशीर्वाद?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close