अंधांसाठी नव्या ‘प्रकाशवाटा’, ब्रेललिपीतून मासिक प्रकाशित

August 10, 2015 7:05 PM0 commentsViews:

10 ऑगस्ट : अंधांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी आणि रोजगाराच्या विविध संधींची माहिती त्यांना मिळावी, यासाठी अनामप्रेम संस्थेच्या वतीने “प्रकाशवाटा’ हे ब्रेललिपीतील मासिक प्रकाशित करण्यात आले. या पहिल्या मासिक अंकाचे प्रकाशन आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांच्या हस्ते करण्यात आलं.

prakashvata_masik22005 पासून अनामप्रेम ही संस्था अंध, अपंग मूकबधीर मुला-मुलींसाठी कार्यरत आहे. संस्थेच्या विविध प्रकल्पांमध्ये सध्या शंभराहून अधिक अपंग स्वत:चे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या या मुलांना स्पर्धा परीक्षा रोजगाराच्या संधींची माहिती मिळाल्यास त्यांना नोकरीचे दरवाजे खुले होतील, हे लक्षात घेऊन “अनामप्रेम’चे अध्यक्ष अजित माने सचिव अजित
कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन “प्रकाशवाटा’ हे ब्रेलमधील मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला.

“प्रकाशवाटा’मासिकाची निर्मिती अनामप्रेममधील अंध मुलांनीच केली आहे. त्याला नेहमीसारखे मुखपृष्ट नाही. सामाजिक दृष्टी कोनातू याकडे पहिले पाहिजे अशे मत मुक्त टिळक यांनी व्यक्त केलं.

“प्रकाशवाटा’मासिकाचे पहिले सहा अंक राज्यातील अंधांच्या विविध संस्थांना मोफत वाटण्यात येणार आहेत. वर्ग पदांच्या शासकीय नेमणुकीसाठी आवश्यक मार्गदर्शन, तसंच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास यांचा समावेश या अंकात असेल. या पहिल्या मासिक अंकाचे प्रकाशन आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांच्या हस्ते करण्यात आलं. नव्या दिशा देणार्‍या “प्रकाशवाटा’ या मासिकामुळे अंध मुले मुख्य प्रवाहात येतील. डोळस लोकांना प्रकाश मिळाला आहे. मात्र, निसर्गाने अन्याय केलेला दिसतोय म्हणून आपण डोळस आहोत का?यावर विचार करण्याची गरज असल्याचं मंदार फणसे यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close