गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारणार – गृहमंत्री

December 14, 2009 1:07 PM0 commentsViews: 1

14 डिसेंबर गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली. सुरक्षेसाठी पालकमंत्रीपद स्वीकारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत उत्तर दिलं. नक्षलवाद्यांनी छुपे युद्ध पुकारले असून त्यांना चोख उत्तर देण्यात येईल. नक्षलवाद्यांचे समर्थक असलेले लोक समाजात वावरत आहेत, त्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे असंही ते म्हणाले. शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना सर्व मदत देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

close