बिग बी बनणार महाराष्ट्रातले वाघोबांचे अॅम्बॅसेडर !

August 10, 2015 7:27 PM0 commentsViews:

big b _on tigar10 ऑगस्ट : बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आता महाराष्ट्रातल्या वाघांचे ब्रँड ऍम्बॅसेडर बनणार आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती अमिताभ बच्चन यांनी स्वीकारली. राज्यातल्या व्याघ्रपर्यटनाला चालना देण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत बनावं, सरकारची इच्छा होती.

त्यानुसार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  29 जुलै रोजी व्याघ्रदिनाचं औचित्य साधत अमिताभ यांना पत्र लिहिलं होतं. लोकांमध्ये व्याघ्रसंवर्धन आणि संरक्षणासाठी जनजागृती करून लोकांचा सहभाग वाढवण्याचा सरकारचा हेतू आहे.

अमिताभ यांची , जनमानसात त्यांच्या विषयी असलेला आदरभाव या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेमध्ये व्याघ्र संवर्धन आणनि संरक्षण या संदर्भात जनजागृती करून या महत्वाच्या प्रकल्पामध्ये जनतेचा सक्रीय सहभाग नोंदवून ही लोकचळवळ निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close