राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

August 10, 2015 9:53 PM0 commentsViews:

maharashtra-navnirman-sena-mns-chief-raj-thackeray5

10 ऑगस्ट :  ठाण्यात आज (सोमवारी ) राज ठाकरेंच्या हस्ते सेल्फी पॉईंटचं उद्घाटन झालं. गडकरी रंगायतन जवळ मनसेच्या वतींनं हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं निमित्त साधून राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी राज ठाकरेंनी दिल्ली ते गल्ली सर्वांचाच आपल्या स्टाईलने समाचार घेतला.

 

भाषणातील ठळक मुद्दे

भय्यू महाराज यांनी आमंत्रण दिलं होतं म्हणून इंदोरला गेलो होतो – राज ठाकरे
उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही गुप्त भेट झाली नाही – राज ठाकरे

उद्धवभेटीच्या बातम्या पेरल्या गेल्या – राज ठाकरे
पत्रकारांना बातम्या पुरवल्या जातात, एकेकांची राजकारण आहे -राज ठाकरे
भाजपला घाबरवण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जातात – राज ठाकरे

मुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंचं प्रशस्तीपत्रक
देवेंद्र फडणवीस चांगला माणूस, चांगलं काम करताय -राज ठाकरे
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करताय, पण त्यांना काम करू दिलं जात नाही, त्यांचे हात बांधलेले आहे -राज ठाकरे

मुख्यमंत्री चांगला की वाईट यापेक्षा मुख्यमंत्री ब्राम्हण की ब्राम्हणेत्तर हे पहायचं का ? – राज ठाकरे
शरद पवार जातीपातीचं राजकारण करताय ?, हाच का जानता राजा – राज ठाकरे
चर्चा करायची नाही केवळ जातीयवादाचं विष यांना पसरवायचं आहे – राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका
बाबासाहेब पुरंदरेंवर टीका करणार्‍यांचा इतिहास काय ? – राज ठाकरे
राष्ट्रवादी नावाचा पक्ष आला तेव्हा महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं – राज
राष्ट्रवादीनं जातीचं राजकारण सुरू केलं- राज ठाकरे
महाराष्ट्रानं देशाला विचार दिला तो महाराष्ट्र आज जातीपातीत खितपत पडलाय -राज ठाकरे
जातीपातीला मनसे कार्यकर्त्यांनी थारा देऊ नये

महाराष्ट्राची राजभाषा मराठी हे 55 वर्षांनी कळलं – राज ठाकरेंचा टोला
सरकार बदललं तरी काहीही फरक पडलेला नाही – राज ठाकरे
जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ बसलीच पाहिजे. केसेस बसतील, सत्ता आली की काढून टाकू -राज ठाकरे

आपण हसतो म्हणून हे माजतात -राज ठाकरे
भाजप कार्यकर्त्याला खोटी आधारकार्ड वाटताना पकडलंय -राज ठाकरे
जे काँग्रेस करायचं तेच भाजप करतंय -राज ठाकरे

याकूबच्या फाशीचा तमाशा बनवून ठेवला -राज ठाकरे
याकूबच्या फाशीचा तमाशा करून या सरकारला दंगली हव्यात -राज ठाकरे
विकलं जातं म्हणून काहीही विकतायत, प्रसारमाध्यमांवर राज ठाकरेंची टीका
देशभक्ताचा एक फोटो, देशद्रोह्याचे आठ फोटो – राज ठाकरे
याकूबच्या फाशीसाठी 3 वाजता सुप्रीम कोर्ट सुरू होतं, हे काय चालंय ? राज ठाकरे
पंतप्रधानांच्या मारेकर्‍यांचा खटला घेणार्‍यांना माफ करणार नाही -राज ठाकरेंची जेठमलानींवर टीका

सलमान खान बेअक्कल, कुठे त्याचे वडील आणि कुठे हा – राज ठाकरे
सलमानच्या घरी गेलो होतो त्यांच्या वडील सलीम खान यांना भेटण्यासाठी गेलो होतो – राज ठाकरे
मी सलमानला भेटायला गेलो नव्हतो – राज ठाकरे

ओवेसी बंधू हरामजादे
ओवेसी वाटेल ती बडबड करतो त्यांच्यावर एक केस नाही मी काही बोलो तर 52 केसेस टाकल्यात – राज ठाकरे
महाराष्ट्रात वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर राज ठाकरेंशी गाठ आहे – राज ठाकरेंचा ओवेसींना इशारा

दहीहंडीचा थर 20 फुटापर्यंत केलाय मग काय घरात हंडी फोडायची का ? – राज ठाकरे
कसली ‘मन की बात’, कुठली ‘मन की बात’ ही तर मौन की बात – राज ठाकरे
तुम्हाला मांसाहार खायचा नाही तर घरात चुपचाप बसा ? – राज ठाकरेंचा मुंबईतील गुजरातींना टोला

मराठी माणूस आज जीव मुठीत धरुन राहतोय – राज ठाकरे
महापालिकांच लक्ष नाही, सगळे पैसे कमावण्यात गुंतलेत – राज ठाकरे
महाराष्ट्रात येणार्‍या कंपन्यांमध्ये मराठी माणसानाच नोकरी लागली पाहिजेत -राज ठाकरे
मराठी मुलं काम करायला तयार पण त्यांना माहितीच दिली जात नाही
मराठी जनतेबरोबर आपण असणं गरजेच, कामाला लागा – राज ठाकरे

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close