राज्य आणि केंद्र सरकारला देशात दंगली हव्यात -राज ठाकरे

August 10, 2015 10:07 PM0 commentsViews:

109raj_on_modi10 ऑगस्ट : मोठ्या विश्रांतीनंतर मनसेचे  अध्यक्ष राज ठाकरे  यांनी आज नेहमीच्याच शैलीत जोरदार भाषण ठोकलं. भाषणाच्या :सुरूवातीलाच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीचं वृत्त फेटाळून लावलं आणि या वृत्ताबाबत माध्यमांनाच जबाबदार धरलं. तसंच याकूबच्या फाशीचा तमाशा बनवून केंद्र आणि राज्य सरकारला देशभरात दंगली घडवायच्या असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. पण त्याचवेळी ते मुख्यमंत्र्यांना प्रामाणिकतेचं सर्टीफिकेट द्यायला विसरले नाहीत. मुख्यमंत्री हे प्रामाणिकपणे काम करत आहे अशी स्तुतीसुमनं राज यांनी उधळली. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला जातीपातीच्या राजकारणावरून टार्गेट केलं. तसंच ओवेसीलाही दम भरला. राज्यात काही वेडंवाकडं करण्याचा विचार जरी केला तर गाठ राज ठाकरेंशी आहे असा दमच राज ठाकरेंनी भरला.

ठाण्यात आज (सोमवारी ) राज ठाकरेंच्या हस्ते सेल्फी पॉईंटचं उद्घाटन झालं. गडकरी रंगायतन जवळ मनसेच्या वतींनं हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं निमित्त साधून राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी राज ठाकरेंनी दिल्ली ते गल्ली सर्वांचाच आपल्या स्टाईलने समाचार घेतला.

‘उद्धव ठाकरेंसोबत गुप्त बैठक झालीच नाही’

भय्यू महाराज यांनी आमंत्रण दिलं होतं म्हणून इंदोरला गेलो होतो. पण लगेल मीडियाने युतीसाठी भय्यू महाराज प्रयत्न करणार अशा बातम्या पेरल्या. हे कसं बरं शक्य आहे. एवढंच नाहीतर उद्धव ठाकरेंसोबत कुठे तरी एका फार्म हाऊसवर म्हणे बैठक झाली. पण अशी कोणतीही गुप्त बैठक झाली नव्हती. मुळात उद्धवभेटीच्या बातम्या पेरल्या गेल्या. पत्रकारांना बातम्या पुरवल्या जातात आणि हे एकेकांची राजकारण आहे. या बातम्या आड भाजपला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली.

‘मुख्यमंत्री चांगला माणूस’

देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे. आणि ते चांगलं काम करताय असं प्रशस्तिपत्रकच राज ठाकरेंनी दिलं. हे पत्र देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली. देवेंद्र फडणवीस चांगलं काम करताय, पण त्यांना काम करू दिलं जात नाही, त्यांचे हात बांधलेले आहे. मोदी आणि शहा दिल्लीतून सूत्रं हलवत आहे. त्यांच्या सांगण्यावर मुख्यमंत्र्यांना काम करावं लागतंय असा आरोपच राज यांनी केला.

‘शरद पवार जातीपातीच राजकारण करताय’

raj on pawarमुख्यमंत्री चांगला की वाईट यापेक्षा मुख्यमंत्री ब्राम्हण की ब्राम्हणेत्तर हे पहायचं का ? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी आपला मोर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे वळवला. शरद पवार जातीपातीचं राजकारण करताय ?, स्वता:हाला जानता राजा समजून घेणारे हेच का ते जानता राजा.

राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासून राज्यात जातीपातीचं राजकारण केलं जात आहे. चर्चा करायची नाही केवळ जातीयवादाचं विष यांना पसरवायचं आहे. बाबासाहेब पुरंदरेंवर टीका केली जात आहे.

पण जे टीका करत आहे त्यांचा इतिहास काय ? असा सवालच राज यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रानं देशाला विचार दिला तो महाराष्ट्र आज जातीपातीत खितपत पडलाय असंही राज म्हणाले.

‘केंद्र आणि राज्य सरकारला दंगली हव्यात’

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं. ते बरं झालं. पण या सरकारने याकूबच्या फाशीचा तमाशा बनवून ठेवला. किती हा गाजावाजा केला. मुळात याकूबच्या फाशीचा तमाशा करून या सरकारला दंगली हव्यात. समाजात यामुळे तेढ निर्माण केला जात आहे असा गंभीर आरोप राज यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केला.

‘सलमान खान बेअक्कल’

सलमान खान हा बेअक्कल आहे. काही वाचत नाही, कसला अभ्यास करत नाही. सलमानच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याचं सांत्वन करण्यासाठी गेलो नव्हतो raj thackarey amir khan nitesh rane meet salman (8)तर त्याचे वडील सलीम खान यांना भेटण्यासाठी गेलो होते. माझ्या वाईट परिस्थितीच्या काळात सलीम खान पाठीशी उभे राहिले होते. त्यामुळे त्यांची भेट घेतली होती. कुठे सलीम खान आणि कुठे सलमान खान. उलट हा सलमान याकूबाबत ट्विटरवर वकिली करतो अशा माणसासोबत मैत्रीचा कदापी विचार करणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

 गाठ राज ठाकरेंशी, ओवेसीला इशारा

एमआयएमचे ते ओवेसी बंधू वाटेल ती बडबड करता. समाजात तेढ निर्माण करता. पण त्यांच्यावर काही कारवाई केली जात नाही. आणि मी काही बोललो तर खटले दाखल केले जातात. या बंधूंनी महाराष्ट्रात वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर राज ठाकरेंशी गाठ आहे. जशाच तसे उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही असा दमच राज ठाकरेंनी भरला.

न्यायालय आणि मीडियावर टीका

याकूबच्या फाशीचं कव्हरेज करणार्‍या मीडियावरही राज ठाकरे चांगलेच बरसले. विकलं जातं म्हणून काहीही विकतायत अशा शब्दात राज यांनी प्रसारमाध्यमांवर टीका केली. याकूबला फाशी दिली जात होती तर मीडियावाले त्याच्या कुटुंबियाच्या मुलाखती दाखवत होते. हे का आणि कशाला करायचं. अब्दुल कलाम यांना अखेरचा निरोप त्याच दिवशी देण्यात आला. पण दुसर्‍या दिवशी एका इंग्रजी दैनिकात देशभक्त कलाम यांचा एक फोटो आणि देशद्रोही याकूबचे आठ फोटो लावले का असं करायचं अशी टीका राज यांनी केली. त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे न्यायपालिकेवर निशाणा साधला. सलमानच्या शिक्षेला 12 वर्षं लागली. याकूबच्या फाशीला 19 वषंर् लागली. नेमका कसला तपास सुरू होता हे जनतेला कळलं पाहिजे. याकूबच्या फाशीसाठी 3 वाजता सुप्रीम कोर्ट सुरू होतं. पण इतर बाबतीत हे घडतं नाही. नेमकं हे काय चालंय ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

राज ठाकरेंची फटकेबाजी

‘अफ्टर ए ब्रेक के बाद’ राज ठाकरेंनी चौहीबाजूने चांगला आसूड ओढला. दहीहंडीचा थर 20 फुटापर्यंत केलाय मग काय घरात हंडी फोडायची का ? असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कसली ‘मन की बात’ हे शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलत नाही. काही करत नाही मग कुठली ‘मन की बात’ ही तर मौन की बात असा टोला राज ठाकरेंनी लगावला. तुम्हाला मांसाहार खायचा नाही तर घरात चुपचाप बसा ? असा सज्जड इशाराच राज ठाकरेंचा मुंबईतील गुजरातींना दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close