नाशिकमध्ये पुन्हा जळीतकांड, चार दुचाकी जळून खाक

August 11, 2015 9:08 AM0 commentsViews:

bike burn411 ऑगस्ट : नाशिकमध्ये पुन्हा एकदा जळीतकांड घडल्यामुळे खळबळ उडालीये. शहरातील कलानगरमध्ये चार दुचाकी जाळण्यात आल्यात. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडलीय. समाजकंटकांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

कलानगरमधील संस्कृती अपार्टमेंटमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकी जाळण्यात आल्यात. आज पहाटे ही उजेडात आली. नाशिकमध्येच दीड महिन्यांपूर्वी भद्रकाली परिसरात दोन गाड्‌या जाळण्यात आल्या होत्या. पाच वर्षांपूर्वी याच परिसरातून अशा प्रकारच्या गाड्या जाळण्याच्या प्रकाराला सुरुवात झाली होती. पाच वर्षांत जवळपास 50 गाड्या अशा प्रकारे जाळण्यात आल्यात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close