दाऊदची 2013 मध्ये होणार होती ‘घरवापसी’ ?

August 11, 2015 10:34 AM0 commentsViews:

Dawood Ibrahim12311 ऑगस्ट : अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी दाऊद इब्राहिम 2013 मध्ये भारतात यायला तयार होता आणि तसा प्रस्ताव त्यानं त्यावेळच्या यूपीए सरकारला दिला होता असा गौप्यस्फोट वकील असलेल्या एका काँग्रेसच्या नेत्यानं केलाय असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं या इंग्रजी दैनिकाने केलंय.

मुत्रपिंडाचा आजार असलेल्या दाऊदची मुंबईत येवून आपल्या कुटूंबियांसमवेत राहण्याची इच्छा होती. आपण भारतात येऊन 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्याला सामोरं जायला तयार आहोत असंही दाऊदनं सांगितल्याचं या वकिलानं स्पष्ट केलंय. या प्रस्तावाबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेमन यांच्याशीही चर्चा झाल्याचा दावा या नेत्यानं केलाय.

दाऊदच्या अटीवर त्याला भारतात येवू देणं शक्य नसल्यानं हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. पंतप्रधानांकडे हा प्रस्ताव देण्याआधी या प्रस्तावाची कल्पना काँग्रेस नेतृत्वाला देण्यात आली होती. या अगोदरही दाऊद भारतात परतण्याच्या तयारीत होता. पण, दाऊदने अटी शर्थी घातल्यामुळे दाऊदची घरवापसी होऊ शकली नाही. पण मनमोहन सिंग यांनी मात्र अशी चर्चा झाल्याचं आपल्याला आठवत नाही असं ई मेलवरून स्पष्टीकरण दिलंय. मनमोहन सिंग म्हणतात, “असा कुठलाही प्रस्ताव आल्याचं माझ्या स्मरणात नाही.”

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close