ज्येष्ठ रंगमहर्षी हरपला, भालचंद्र पेंढारकर यांचं निधन

August 11, 2015 12:11 PM0 commentsViews:

bhalchandra pendharkar11 ऑगस्ट : ज्येष्ठ रंगकर्मी आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अष्टपैलू कलावंत भालचंद्र पेंढारकर यांचं मुंबईत निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. पेंढारकर यांच्यावर मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

भालचंद्र पेंढारकर यांना अण्णा म्हणून रंगमंचावर ओळखलं जायचं. अण्णा ‘ललितकलादर्श’ या शंभरी पार केलेल्या संस्थेचे संस्थापकही होते. या संस्थेअंतर्गत त्यांनी अनेक नाट्य, नेपथ्य, छायाचित्रणाच कार्य पार पाडलं. दुरितांचे तिमीर जावो, संगीत सौभद्र ही त्यांची गाजलेली नाटकं होती. तसंच पंडितराज जगन्नाथ, बावनखणी,जय जय गौरीशंकर, आनंदी गोपाळ ही वेगळ्या थाटाची नाटकंही गाजली.राज्य सरकारतर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. तसंच प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, केशवराव भोसले पुरस्कार ही त्यांना प्रदान करण्यात आले होते. पेंढारकर यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीवरची ऊर्जा हरपली अशी भावना व्यक्त होत आहे.

भालचंद्र पेंढारकर यांची गाजलेली नाटके

दुरितांचे तिमीर जावो
संगीत सौभद
पंडितराज जगन्नाथ
बावनखणी जय जय गौरीशंकर
आनंदी गोपाळ
भावबंधन
स्वामिनी
झाला अनंत हनुमंत

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close