राम प्रधान समितीचा अहवाल पुढील सोमवारी सादर करणार – आर. आर. पाटील

December 14, 2009 1:13 PM0 commentsViews: 1

14 डिसेंबर 26/11 हल्ल्याप्रकरणाची चौकशी करणारा राम प्रधान समितीचा अहवाल सोमवारी दोन्ही सभागृहातल्या संयुक्त समितीसमोर सादर करू, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. सरकारने अजूनपर्यंत दडवलेला राम प्रधान अहवाल आयबीएन-नेटवर्कने देशाच्या हितासाठी जनतेसमोर मांडला होता. त्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. 26/11 प्रकरणाची चौकशी करणार्‍या या अहवालातून पोलीस दलातल्या अनेक त्रुटी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांमधला बेबनाव समोर आला होता. हा अहवाल अधिवेशनात सादर करा, असा आग्रह विरोधकांनी धरला होता. गहाळ जॅकेट प्रकरणातल्या दोषी अधिकार्‍यांवर 10 दिवसांत कारवाई मुंबई हल्ल्यातले शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या गहाळ झालेल्या जॅकेट प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर 10 दिवसांत कारवाई करू अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली. गहाळ जॅकेट प्रकरणी पोलीस आयुक्त हसन गफूर यांच्या खुलाशावर सरकार समाधानी नसल्याचं त्यांनी सांगितलं. सेवाशर्तनुसार गफूर यांच्यावर कारवाई करणार असल्याचं गृहमंत्री म्हणाले.

close