दिल्लीत आंदोलनादरम्यान योगेंद्र यादव यांना अटक

August 11, 2015 1:00 PM0 commentsViews:

yogendra yadav arrest3411 ऑगस्ट : आपचे माजी नेते आणि स्वराज अभियानचे संस्थापक योगेंद्र यादव यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीये. भूसंपादन विधेयकाच्या विरोधात योगेंद्र यादव दिल्लीत जंतरमंतरवर शेतकर्‍यांसोबत निदर्शनं करत होते. त्यावेळेस अगदी नाट्यपूर्णरित्या योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानतंर त्यांना अटक करण्यात आल्याचं आज पोलिसांनी सांगितलं.

10 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली होती. पण त्यांनी रात्रीपर्यंत आंदोलन सुरू ठेवल्याने त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनच्या बाहेरही त्यांच्या समर्थकांचा ड्रामा पाहायला मिळाला. योगेंद्र यादव यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्कीही झाली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close