राज ठाकरे विदर्भाच्या दौर्‍यावर

December 15, 2009 9:31 AM0 commentsViews: 7

15 डिसेंबर राज ठाकरे मंगळवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. मंगळवारी सकाळी राज ठाकरे नागपुरात पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राज ठाकरेंच्या या दौर्‍याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या वेगळ्या विदर्भाचा मुद्दा जोर धरू लगाला आहे. याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तसेच राज ठाकरे हे विधान भवनातील मनसेच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. विदर्भाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी देखील चर्चा करणार आहेत.

close