विदर्भात एकाच दिवशी दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

August 11, 2015 1:50 PM0 commentsViews:

farmmer11 ऑगस्ट : एकीकडे मराठवाड्यात केंद्रीय पाहणी पथक दुष्काळ दौरा करतंय तर दुसरीकडे विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहे. आज एकाच दिवसात राज्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या केल्यात.

भंडारा जिल्ह्यातील हरदोली झनझाड इथल्या तेजराम बुरडे या शेतकर्‍यानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीये. त्यांच्यावर बँकेचं 2 लाख रूपयांचं कर्ज होतं. तर बुलडाण्यातही कैलास भिसे या शेतकर्‍यानं आत्महत्या केलीये.

दुबार पेरणीचे संकट आणि कर्जाचा डोंगर यामुळे या शेतकर्‍यानं स्वत: च्या शेतातच विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवलीये. या शेतकर्‍यावर बँकेचे 50 हजारांचं कर्ज होतं. कर्जबाजीपणाला कंटाळून एकाच दिवशी दोन शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close