पिंपरीत केएफसीवर दरोडा, पिस्तुलाचा धाक दाखवून 70 हजार लुटले

August 11, 2015 3:52 PM0 commentsViews:

11 ऑगस्ट : हॉटेल व्यवस्थापकाच्या डोक्याला पिस्तुल लावून चोरट्यांनी 70 हजारांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

PIMPRI CCTV FOOTAGE

पिंपरी शहरातील रहाटणी परिसरात असलेल्या के.एफ.सी. सेंटरमध्ये हा प्रकार घडला असून 70 हजारांची रक्कम लुटून चोरटे फरार झाले आहेत. आता सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने या चोरट्यांचा शोध घेणं सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वाकडेवाडी परिसरातही अशाच प्रकारचा एक दरोडा पडला होता. एकूणच पिंपरीमध्ये आता चोरट्यांना पोलिसांचा धाकच उरला नाहीये का असा प्रश्न इथल्या नागरीकांना पडला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close