बेकायदा बांधकाम प्रकरणी तडजोडीस स्वयंसेवी संस्थांचा विरोध

December 15, 2009 9:35 AM0 commentsViews: 1

15 डिसेंबर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी पुणे महानगरपालिकेकडे आलेल्या तडजोडीच्या प्रस्तावाला स्वयंसेवी संस्थांनी विरोध दर्शवला आहे. एरंडवण्यातील एका इमारतीबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. मोबदला देऊन ही इमारत ताब्यात घ्यावी असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. प्राथमिक शाळेकरिता आरक्षित असलेल्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याने सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी होते. मंगळवारी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

close