आधार कार्डची सक्ती नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

August 11, 2015 4:51 PM0 commentsViews:

SC_Aadhaar_04102013

11 ऑगस्ट : आधार कार्डबाबत सुप्रीम कोर्टाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. इतून पुढे एलपीजी आणि रेशन धान्याव्यतिरिक्त आधार कार्डाची सक्ती नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. तसंच आधार कार्ड सक्तीचे नसल्याची माहिती जाहिरातीद्वारे लोकांपर्यंत पोहचवा, असा आदेशही कोर्टाने केंद्र सरकारला दिला आहे.

यापुढे फक्त स्वस्त धान्य, रॉकेल आणि गॅस वितरणासाठी त्याचबरोबर गुन्हय़ाच्या तपासकामात ओळख पडताळणीसाठी आधारकार्डचा वापर करता येणार आहे, असंही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारच्या शासकीय आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची सक्ती करू नये असंही कोर्टाने आदेशात म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close