प्रचंड गदारोळात जीएसटी विधेयक राज्यसभेत सादर

August 11, 2015 8:03 PM0 commentsViews:

Arun Jaithley

11 ऑगस्ट : प्रचंड गदारोळात आज (मंगळवारी) अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक राज्यसभेत सादर केलं. मात्र, गोंधळ अधिकच वाढल्याने आणि विरोधक थेट जेटली यांच्या समोर येऊन घोषणा देऊ लागल्याने विधेयक सादर झाल्यानंतर लगेचच सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

जीएसटी विधेयक आधीच लोकसभेत मंजूर झालेलं असून आता या विधेयकाची खरी परीक्षा राज्यसभेत होणार आहे. 1 एप्रिल 2016 पासून जीएसटी अंमबजावणी करण्याचा इरादा असून आज काँग्रेस खासदारांनी केलेला गदारोळ पाहता हे विधेयक पावसाळी अधिवेशनात संमत होऊ शकणार का?, हा प्रश्न सरकारपुढे उभा राहिला आहे.

हे घटनादुरुस्ती विधेयक चर्चेला घेताना उपस्थित सदस्यांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त सदस्यांचे समर्थन अवशक आहे. हे संख्याबळ गाठणं काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय अवघड ठरणार आहे. विधेयकाला काँग्रेस वगळता बाकीच्या विरोधी पक्षांनी सहमती दर्शवलेली असून आता सरकारपुढे काँग्रेसविरोध हाच मोठा कळीचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या खासदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे सध्यातरी पक्षाने जो पवित्रा घेतला आहे ते पाहता काँग्रेसचे मन वळवणे सरकारल शक्य दिसत नाही. आज अरुण जेटली हे विधेयक सादर करत असताना काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close