कोल्हापूरकरांना तुर्तास दिलासा,15 दिवस टोल नाही !

August 11, 2015 8:32 PM0 commentsViews:

toll vasuli

11 ऑगस्ट : अखेर कोल्हपूरकरांना टोलपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. कोर्टाचा निर्णय होईपर्यंत कोल्हापूरकरांना 15 दिवसासाठी टोलमुक्ती देण्यात आली आहे. अश्या प्रकारच्या सुचना राज्य राज्यसरकाराने आयआरबीला दिल्या आहेत.

कोल्हापूर टोलचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार जोरदार प्रयत्न करतेय. या टोलबाबत नेमलेल्या दोन समित्यांनी आपले अहवाल सादर केलेत. यापार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती पुर्नमुल्यांकन करणार आहे. ही समिती 15 दिवसात अहवाल देईल आहे. त्यानंतर कोल्हापूर टोल प्रश्नी निर्णय घेतला जाणार असल्याची माहीती शिंदे यांनी दिली.

टोल स्थगिती प्रकरण कोर्टात असल्यामुळे 15 दिवस निर्णय होईपर्यंत आयआरबीने टोल घेऊ नये अशी सुचना राज्य सरकारने आयआरबीला दिल्या आहेत. त्यामुळे किमान 15 दिवसतरी कोल्हापूरकरांची टोलमधून मुक्तता झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close