दुष्काळी पथक चाचपडतंय अंधारात!

August 11, 2015 10:41 PM0 commentsViews:

Dushkal Banner

11 ऑगस्ट : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक सध्या मराठवाड्याचा दौर्‍यावर आहे. पण या पथकाचा प्रताप म्हणजे अंधारातच हे पथक दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करतंय. त्यामुळे हे पथक दुष्काळ दौर्‍याबाबत गंभीर आहे की फक्त औपचारिकता म्हणून दौरा करतंय, असा प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे बळीराजा दुष्काळाच्या झळा सोसतंय तर दुसरीकडे ज्या लोकांवर शेतकर्‍यांच्या मदतीची रक्कम ठरवायची जबाबदारी आहे, तेच अंधारात चाचपडत आहेत.

केंद्रीय दुष्काळी पथकानं मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यात पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांनी केंद्रीय पथकासमोर व्यथा मांडल्या. या पथकानं कन्हेरी, सारोळा, पाडोळी, महाळंगी या गावांना भेटी दिल्या. या केंद्रीय पथकामध्ये 3 अधिकार्‍यांचा समावेश आहे. यावेळी राघवेंद्र सिंह यांनी शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, दुष्काळाची पाहणी करणार्‍या केंद्रीय पथकानं ठरलेल्या काही गावांना भेटी दिल्या नाहीत, त्यामुळे वाट पाहणारे शेतकरी नाराज झालेत. मोठं नुकसान झालेल्या उस्मानाबादमधल्या पारडी गावातही केंद्रीय पथकानं पाहणी केली नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close