कोंडी कायम, जीएसटी विधेयक रखडणार ?

August 12, 2015 9:09 AM0 commentsViews:

gst bill12 ऑगस्ट : संसदेचं पावसाळी अधिवेशन संपायला केवळ दोन दिवस उरले आहे आणि सरकार जीएसटी विधेयक संमत करू शकेल का याबाबत शंका निर्माण झालीये. कारण प्रचंड गदारोळात जीएसटी विधेयक मंगळवारी राज्यसभेत सादर करण्यात आलं. या सत्रात गदारोळामुळे विधेयकावरून सभागृहाचं कामकाज बंद होतंय.

जीएसटी विधेयक सादर केल्यानंतर प्रचंड गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. काही झालं तरी सभागृह चालू द्यायचं नाही, या भूमिकेवर ठाम राहा, असे आदेश काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी खासदारांना दिलेत. ललित मोदी आणि व्यापम घोटाळ्यावर सभागृह बंद पाडायचं यावर काँग्रेस ठाम आहे. त्यामुळे लोकसभेतही गदारोळ पाहायला मिळाला. तर दुसरीकडे राज्यसभेतल्या वेगवेळ्या पक्षाच्या संख्याबळावर आणि जीएसटीच्या बाजूने आणि विरोधात किती संख्याबळ आहे यावर सारंकाही अवलंबून आहे.

 जीएसटीची कोंडी
विरोधात : 78
काँग्रेस : 68
सीपीएम : 9
सीपीआय : 1

बाजूने : 100
भाजप : 48
तृणमूल काँग्रेस : 12
बिजू जनता दल : 6
समाजवादी पक्ष : 15
द्रमुक : 4
एनडीएतले इतर पक्ष : 15

कुंपणावरचे (60)
अण्णाद्रमुक
बहुजन समाज पक्ष
संयुक्त जनता दल

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close