तिसर्‍या आघाडीसाठी दिल्लीत शरद पवारांच्या घरी खलबतं ?

August 12, 2015 1:22 PM0 commentsViews:

pawar_on_bjp_news12 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवारी) दिल्लीत विविध छोट्या पक्षांच्या नेत्यांना आपल्या घरी निमंत्रित केलंय. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी बिगर भाजप आणि काँग्रेसेतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवार करत असल्याची जोरदार चर्चा सध्या राजधानीत आहे.

पवारांच्या घरी होणार्‍या या बैठकीत तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पक्षासहीत इतर काही पक्षही या बैठक सहभागी होणार आहेत. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निमंत्रण दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येणार आहे. या बैठकीत मुलायम सिंह यादवही सहभागी होणार आहे. याआधी तिसर्‍या आघाडीची घोषणा झाली होती, मात्र त्याचं पुढं फारसं काही झालं नाही. त्यामुळं पवारांच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close