LIVE : अखेर भाजप नरमलं, ललितगेटवर चर्चा सुरू

August 12, 2015 1:55 PM0 commentsViews:

loksabha 45235

अपडेट्स


– पंतप्रधानांनी स्वत: सभागृहात यावं, तरच आमचं समाधान होईल
– मोदींवर जोरदार टीका, पंतप्रधान रेडिओ, टीव्हीवर बोलतात किंवा जाहिरातीत बोलतात
– सरकारनं ललित मोदींच्या विरोधात अपील केलं नाही -खरगे
– सरकार अहंकारी आहे सत्तेपुढं शहाणपण चालत नाही -खरगे
– सुषमांनी ललित मोदींना मदत केली -खरगे
– ललित मोदींना सुषमांच्या कुटूंबियांची मदत -खरगे
– सरकारनं ललित मोदींच्या विरोधात अपील केलं नाही -खरगे
– अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयानं ललित मोदींना मदत केली -खरगे
– ललित मोदींच्या विरूद्ध एवढ्या केसेस असताना मंत्र्यांनी मदत का केली -खरगे
– ललित मोदी प्रकरणावर अखेर लोकसभेत चर्चा सुरू
– मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली चर्चला सुरवात
– पंतप्रधान चर्चेच्या वेळी उपस्थित नाहीत
– काँग्रेस खासदारांचं काळ्या फिती बांधून निषेध
– 14 दिवसांच्या गदारोळानंतर होतेय चर्चा

===================================================================================

12 ऑगस्ट : अखेर 14 दिवसांच्या कोंडीनंतर लोकसभेत चर्चेला सुरुवात झालीये. काँग्रेसपुढे नमतं घेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज स्थगन प्रस्तावावर चर्चा करायला तयार असल्याचं स्पष्ट केलं. सभागृह अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव मंजूर करावा, ललित मोदी प्रकरणावर चर्चा करायला आपण तयार असल्याचं स्वराज यांनी म्हटलं.

यावर काँग्रेसने नवी खेळी खेळली. चर्चा व्हावी, पण चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजर राहावं, अशी मागणी काँग्रेसने केली. यानंतर सभागृहात गदारोळ झाला. तिकडे राज्यसभेमध्येही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अखेर स्थगन प्रस्तावावर चर्चेला सुरूवात झालीय काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. सुषमा स्वराज यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा अशी मागणी खरगे यांनी केली.

फालतूपणा बंद करा, लोकसभाध्यक्ष कडाडल्या

लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गोंधळ तर सुरुच होता. पण यामुळे दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष आणि सभापती मात्र व्यथित झाले. सदस्य आपली जागा सोडून आल्यावर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांना चांगलाच दम भरला. हा फालतूपणा करू नका, हे सभागृह आहे. त्याचा सन्मान करायला शिका, असं त्यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close