राज ठाकरे यांना ठार मारण्याची धमकी देणारं पत्र

December 15, 2009 10:27 AM0 commentsViews: 8

15 डिसेंबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठार मारण्याची धमकी देणारं पत्र आलं आहे. त्याआधारे मनसेचे गटनेतेे बाळा नांदगावकर यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली. यावर अध्यक्षांनी बुधवारी विधिमंडळात चर्चा करण्याचं आश्‍वासन दिलं आहे. या धमकी पत्रात राज ठाकरेंना मारण्यासाठी 5 बिहारी तरुण महाराष्ट्रात दाखल झाल्याचं सांगण्यात आलं आहे तसेच राज ठाकरेंना 25 डिसेंबरपर्यंत ठार मारू, अशी धमकीही देण्यात आली आहे. हे पत्र सर्वोदय समाज संस्थेचे अध्यक्ष अशोककुमार सिंग यांच्या सहीचं आहे.

close