चुरशीच्या सामन्यात भारताचा विजय

December 15, 2009 1:24 PM0 commentsViews: 2

15 डिसेंबर राजकोटमध्ये जबरदस्त चुरशीच्या झालेल्या पहिल्या वन-डेत भारताने विजय 3 रन्सनी मिळवला. या मॅचबरोबरच भारताने पाच वन-डे मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने वन-डे क्रिकेटमधला आपला हायेस्ट स्कोर नोंदवत 414 रन्सचा डोंगर उभा केला. याला श्रीलंकेनेही जशास तसं उत्तर दिलं. तिलकरत्ने दिलशान आणि उपुल थरंगा यांनी ओपनिंगसाठी तब्बल 188 रन्सची पार्टनरशिप केली. थरंगा 67 रन्सवर आऊट झाला. पण दिलशानने आपली आक्रमक बॅटिंग सुरूच ठेवली. त्याने संगकाराच्या मदतीने श्रीलंकेला 300 रन्सचा टप्पा पूर्ण करून दिला. संगकारानेही तुफान फटकेबाजी केली. 5 सिक्स आणि 10 फोर मारत अवघ्या 43 बॉल्समध्ये 90 रन्स केले तर दिलशान डबल सेंच्युरी करणार असं वाटत असतानाच हरभजनने त्याला क्लीन बोल्ड केलं. दिलशानने 160 रन्सची शानदार खेळी केली. त्याआधी वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक बॅटिंगच्या जोरावर भारताने 414 रन्स केले. सेहवागने 146 रन्स करत वन-डे क्रिकेटमधला आपला हायेस्ट स्कोर नोंदवला. तोच या मॅचचा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.

close