दहीहंडीला अखेर साहसी खेळाचा दर्जा

August 12, 2015 9:14 PM0 commentsViews:

DAhi handi asneu

12 ऑगस्ट : गोविंदा रे गोपाळा… अशी गाणी म्हणतं उंच मानवी थर रचून साजरा केला जाणार्‍या दहीहंडीला आता राज्य सरकारने साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत याबाबची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गोविंदा पथकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा द्या मिळावा यासाठी दहीहंडी मंडळांसह जितेंद्र आव्हाड आणि सचिन अहिर अशा अनेक लोकप्रतीनिधींकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सरकारतर्फे याबाबत निर्णय देण्यासाठी आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. यंदा 20 फुटांपेक्षा उंच दहीहंडी बांधता येणार नाही. त्याचबरोबर 12 वर्षांपेक्षा कमी वय असणार्‍या बालगोविंदांना यामध्ये सहभागी होता येणार नाही, असे आदेश हाय कोर्टाने दिले होते.

त्यावर आज राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसंच 12 वर्षाखालील मुलांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. दहीहंडीच्या चौथ्या थराच्या वर जाणार्‍या गोविंदांनाही हा नियम लागू असेल अशी माहिती तावडे यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे गोविंदा पथकांनी स्वागत केले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close