वेगळ्या विदर्भाला मनसेचा विरोध – राज ठाकरे

December 15, 2009 1:27 PM0 commentsViews: 4

15 डिसेंबर वेगळ्या विदर्भाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर आहेत. नागपूर पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. विदर्भाच्या मागासलेपणाला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली तर याच मुद्द्यावरून विरोधी पक्षावरही टीका केली. शरद पवारांनी फक्त बारामतीचा विकास केला असं म्हणत त्यांनी शरद पवारांनाही लक्ष्य केलं. महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ असल्याच्या आपल्या भूमिकेचा राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. छोट्या राज्यांबद्दलचा मुद्दा संवेदनशील आहे. त्यामुळे या विषयावर आपण अभ्यासक आणि तज्ज्ञांची मतं जाणून घेत असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

close