धक्कादायक…! शिवनेरीच्या ड्रायव्हरला फरफटत नेलं!

August 12, 2015 10:57 PM0 commentsViews:

 

12 ऑगस्ट : नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये गाडीला धक्का लागला, म्हणून शिवनेरी बसच्या ड्रायव्हरला फरफटत नेण्याची घटना घडली आहे. ऐरोलीच्या खेडकर चौकात शिवनेरी बस ड्रायव्हर आणि कार चालकामध्ये वाहतुकीच्या नियमांवरुन हमरीतुमरी झाली. यामध्ये कार चालक अब्दुल अन्सारीने शिवनेरी बसचे वायपर तोडले. त्यामुळे बस चालक संतोष शिळीमकर चांगलाच भडकला. त्यानंतर पुढे जे घडलं ते एखाद्या बॉलीवुड फिल्ममध्ये शोभणारं होतं.

संतोषने थेट कारच्या बॉनेटचा ताबा घेतला. मात्र कार चालकाने स्पीड वाढवत थेट 300 मीटरपर्यंत त्याला ओढत नेलं. यामुळे बस चालकाचा तोल जाऊ तो खाली पडला. जखमी झाल्यानं शिळीमकरवर रुग्णालयात उपचार करुन त्याला सोडून देण्यात आलं.

दरम्यान हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी अन्सारीला ताब्यातही घेतलं. मात्र त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. 27 जुलैला संध्याकाळी हा धक्कादायक प्रकार घडला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close