मॅगीवरची बंदी अखेर उठवली

August 13, 2015 2:02 PM0 commentsViews:

maggi ban13 ऑगस्ट : अखेर सहा आठवड्यानंतर मॅगीवरची बंदी उठवण्यात आलीये. मुंबई उच्च न्यायालयाने मॅगीवरची बंदी सशर्त उठवण्यात आली आहे. पण मॅगीची विक्री मात्र आता आणखी 6 आठवड्यांनंतर सुरू होणार आहे. मॅगीवर बंदी घालताना नैसर्गिक न्यायाचा विचार करण्यात आला नाही, असं कोर्टाने नमूद केलंय.

दोन मिनिटांत तयार होणारी चटकदार मॅगीवर फूड सेफ्टी ऍड स्टँडर्ड्स ऑथोरिटी ऑफ इंडियाने बंदी आणली होती. मॅगीमध्ये शिशाचं अतिरिक्त प्रमाण आढळून आल्यामुळे ही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, हरियाणा राज्यासह इतर भागात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. बाजारातून मॅगीची उत्पादन मागे घेण्यात आली होती. या बंदीच्या विरोधात नेस्ले इंडिया कंपनीने हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर आज हायकोर्टाने नेस्लेला दिलासा दिलाय. हायकोर्टाने आज मॅगीला सशर्त परवानगी दिलीये. मॅगीची चाचणी करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रयोग शाळा अनधिकृत असल्यामुळे त्यांचा निर्णय ग्राह्य धरता येणार नाही. बंदी घालताना नैसर्गिक न्यायाचं पालन करण्यात आलं नाहीअसं कोर्टाने नमूद करत मॅगीवरची बंदी उठवलीये. मॅगीच्या 9 पैकी 5 उत्पादनांची येत्या 6 आठवड्यांत 3 वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये चाचणी होणार आहे. चाचण्या पूर्ण होईपर्यंत मॅगीला उत्पादने विकण्याची परवानगी नाही. या चाचण्यानंतरच मॅगी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

उच्च न्यायालयानं काय म्हटलंय ?
– बंदी घालताना नैसर्गिक न्यायाचं पालन करण्यात आलं नाही
-FSSAI नं घातलेल्या बंदीचा निर्णय उच्च न्यायालयानं रद्द ठरवला
-बंदी आदेश हे नियमाचा भंग करणारी आहे
-मॅगीच्या 9 पैकी 5 उत्पादनांची येत्या 6 आठवड्यात 3 वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये चाचणी होणार
-चाचण्या पूर्ण होईपर्यंत मॅगीला उत्पादने विकण्याची परवानगी नाही

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close