धान्य मद्यनिर्मिती प्रकल्प : विलासरावांचं मुख्यमंत्र्यांवर शरसंधान

December 17, 2009 7:32 AM0 commentsViews: 1

17 डिसेंबरमुख्यमंत्री अशोक चव्हाण हे जबाबदारी झटकण्याचं काम करतायत असा टोला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी हाणला. मद्यनिर्मिती प्रकल्पाला मंजुरी देणं हा केवळ मुख्यमंत्र्याचा निर्णय नसून मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. हा निर्णय घेतला त्यावेळी अशोक चव्हाण मंत्रिमंडळात होते, असंही देशमुख यांनी म्हटलंय. अशोक चव्हाण यांनी धान्यापासून मद्यनिर्मिती करण्याचा निर्णय आपला नसून विलासराव देशमुख यांचा असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं संतप्त झालेल्या विलासरावांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केल्याचं बोललं जातंय. महत्वाचं म्हणजे धान्यापासून पासून मद्यनिर्मितीचा निर्णय झाल्यानंतर पहिल्या ज्या 3 कंपन्यांना सरकारनं मान्यता दिली होती, त्यात देशमुख यांचा मुलगा अमित याच्या कारखान्याचा समावेश होता. गेल्या अनेक दिवसापासून अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्यातील शीतयुध्द भडकलंय. विलासराव देशमुख यांनी काल माळेगावला मी अवजड उद्योग मंत्री आहे, नांदेडमधल्या छोट्या उद्योगामागे मी लागत नाही, असा टोला हाणला होता. ज्यांना राजकारण कळते ते कधी उताविळपणा करत नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.

close