उस्मानला पकडून देणार्‍या राकेश शर्मा आणि विक्रमजीत यांचा गौरव

August 13, 2015 3:13 PM0 commentsViews:

rakesh and vikrajit13 ऑगस्ट : जीवाची बाजी लावून दहशतवादी मोहम्मद नावेद उर्फ उस्मानला पकडून देणार्‍या राकेश शर्मा आणि विक्रमजीत यांचा आज (गुरुवारी) मुंबईत ऑल इंडिया अँन्टी टेररीस्ट फ्रंन्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुस्कार देऊन गौरवण्यात आलं.

2 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये दहशतवादी अजमल कसाब नंतर मोहम्मद नावेद उर्फ उस्मान पकडण्यात आलं. पण, खरी कामगिरी बजावली ती भाऊजी आणि मेव्हण्यानी. या दोघांनी या दहशतवाद्याला रोखलंच नाही तर पोलिसांच्या ताब्यात पकडून दिलं.

राकेश शर्मा आणि विक्रमजीत या दोघांच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आज मुंबईत त्यांना प्रेस क्लबमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज’ पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. ऑल इंडिया ऍन्टी टेररीस्ट फ्रंन्ट चे अध्यक्ष एम एस बीट्टा यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात येत आहे. यावेळी सिने अभिनेता सुनिल शेट्टीही उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close