मुंबईत दुकानदारावर गुंडाचा तलवारीने हल्ला, धाडसी ग्राहकाने गुंडाला पकडले

August 13, 2015 4:57 PM0 commentsViews:

13 ऑगस्ट : चेंबुरमध्ये दिवसाढवळ्या एका दुकानदारावर गुंडाने तलवारीनं हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. चेंबुरच्या पी.एल लोखंडे मार्गावरची ही घटना आहे. हा सर्व थरारक हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ज्यावेळी हल्ला झाला तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकाने धाडस दाखवल्यामुळे हा गुंड पकडला गेला. या गुंडाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.chembur_Attack

चेंबुरच्या पी.एल लोखंडे मार्गावर रजनीश सिंह यांचं दुकान आहे. काही गुंडांनी हप्ता देत नाही तसंच गुंड आणि नशेखोरांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून एका गुंडाने तलवारीने हल्ला केला. सुदैवाने रजनीश यांच्या कानावर आणि हातावर निभावले. त्यामुळे त्यांचा जिव वाचला. त्या दुकानात आलेल्या ग्राहकाने प्रसंगावधान राखत गुंडावर झडप मारली आहे. दुकानातील नोकरही मदतीस धावून आला. हा गोंधळ सुरू असताना लोकांनीही यात उडी घेतली आणि या गुडाला तसंच इतर त्याच्या चार साथीदारला पकडून टिळक नगर पोलिसांच्या स्वाधीन केलं. रजनीश सिंह यांच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. हे गुंड या परिसरातील छोट्या मोठ्या दुकानदारांना हप्त्यासाठी धमकी देऊन त्रास देत असता. याबद्दल दुकानदारानी तक्रार सुद्धा टिळक नगर पोलिसात केली होती पण पोलिसांनी कोणतेच पाऊल न उचलल्यामुळे आज एका गुंडाने दुकानदारावर प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात रणजीत सिंह बालबाल बचावले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close