कसाबने जबाब फिरवला

December 18, 2009 9:00 AM0 commentsViews: 1

18 डिसेंबर मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याने आपला जबाब फिरवला आहे. माझा मुंबई हल्ल्यात सहभाग नव्हता, मला मारहाण करुन जबरदस्तीने माझा जबाब नोंदवून घेतला गेला. तसंच माझा मानसिक छळ करण्यात आला. मी आयुष्यात कधी एके-47 बघितली सुद्धा नाही, असा नवा जबाब कसाबने दिला आहे. कसाबने दिलेल्या जबाबीचा खटल्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं म्हणणं आहे. शुक्रवारी विशेष न्यायालयात कसाबचा जबाब नोंदवण्यात आला तेव्हा कसाबने असं सांगितलं आहे.

close