काँग्रेसच्या अशा वागण्यामुळे आणीबाणीची आठवण,मोदींचा पलटवार

August 13, 2015 5:54 PM0 commentsViews:

M_Id_484311_Narendra_Modi13 ऑगस्ट : ललितगेट प्रकरणावरुन काँग्रेसने घातलेल्या गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. काँग्रेसच्या अशा वागण्यामुळे आणीबाणीची आठवण येत आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये.

गुरुवारी लोकसभेत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामनाच रंगला होता. आता लोकसभेतलीही लढाई रस्त्यावर आलीये. काँग्रेसने संसदेबाहेर निदर्शनं केली. एनडीएनं आज लोकशाही बचाव मोर्चा काढला. त्यापूर्वी एनडीएची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन काँग्रेसच्या विरोधामुळे अक्षरशः वाहून गेलं. कोणतंही ठोस काम लोकसभा किंवा राज्यसभेत होऊ शकलं नाही. त्यामुळे काँग्रेस लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप एनडीएचे नेते करत आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसचा पवित्रा आणीबाणींच्या दिवसांसारखाच आहे. काँग्रेसला सर्व सत्ता एकाच कुटुंबाकडे रहायला हवी आहे. त्यामुळे त्यांची धडपड सुरू आहे अश ा शब्दात मोदींनी टीक ा केलीये. तसंच काँग्रेसची एका कुटुंबाला वाचवण्याची इच्छा आहे पण भाजपला देशाला वाचवण्याची इच्छा आहे असंही मोदी म्हणाले.

‘राहुल गांधी अजूनही बालिश’

दरम्यान, अरूण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर सडकून टीका केली. काँग्रेसने लोकशाहीचा अपमान केलाय. काँग्रेसच्या विरोधामुळे अधिवेशन वाया गेलं. त्याचे नेते राहुल गांधी आज भाजपवर टीका करत आहे. पण, आपण वरिष्ठ झालो तर आपली टीकाही तशीच असायला हवी. पण राहुल गांधी जसेजसे मोठे होत आहेत तसे तसे अधिक अपरिपक्व होत आहेत. राहुल गांधी भाषण आणि घोषणा यातला फरक जाणू शकत नाही अशी टीका जेटलींनी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close