अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं नुकसान

December 18, 2009 10:53 AM0 commentsViews: 6

18 डिसेंबर नाशिक, जळगाव, धुळे कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये गुरूवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. पावसामुळे गहू, हरभरा, द्राक्ष आणि भाजीपाल्याचे मोठं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या नांदूर मध्यमेश्वर परिसरात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास जवळजवळ दीड तास अचानक झालेल्या जोरदार गारपीटीत परिसरातील सर्वच पिकांचं संपूर्ण नुकसान झालं आहे. अकाली आलेल्या पावसाचा जोरदार तडाखा जळगाव जिल्ह्यालाही बसला आहे. पारोळा आणि अमळनेर या दोन तालुक्यांत झालेल्या गारपीटने पिकांना फटका बसला आहे. अमळनेर बाजार समिती आवारांत असलेला धान्य साठा या पावसांत पूर्ण भिजल्याने व्यापार्‍यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानाच्या पंचनाम्यानंतर नुकसानीचा निश्चित आकडा समोर येईल.

close