प्रा. जयंत पाटील यांचा नगरसेवकांना शिवीगाळ

December 18, 2009 12:44 PM0 commentsViews: 4

18 डिसेंबर नगरसेवकाने पैसे घेऊनही मतदान न केल्याने प्रा.जयंत पाटील यांनी शिवीगाळ केली. कोल्हापूरमध्ये विधानपरिषद निवडणुकी दरम्यानही बाचाबाचीची घटना घडली आहे. पाटील सकाळी मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर आले. तेव्हा त्यांनी नगरसेवकांना जाहिररित्या शिवीगाळ केली. तुम्ही पैसे घेता आणि मतदान करत नाही तेव्हा आता माझे पैसे परत द्या, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकारामुळे विधानपरिषद निवडणुकीत पैशांचे व्यवहार झाल्याचं उघड झालं आहे.

close