सिंचनाचे पैसे दिवट्याने कसे गिळले ते पाहा, उद्धव ठाकरेंचा घणाघात

August 13, 2015 9:51 PM3 commentsViews:

uddhav_on_sharad_pawar13 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहे. त्यांच्या या दौर्‍यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरी स्टाईलने घणाघात केलाय. राष्ट्रवादी म्हणजे रिकामं डबडं झालंय. सिंचनाचे पैसे तुमच्या दिवट्यांनी कसे गिळले आहे त्याचे परिणाम पाहा अशा विखारी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीये. तसंच पवार साहेबांना विनंती करतो धरणाच्या आजूबाजूला जाणार असाल तर अजित पवारांना नेऊ नका असा टोलाही लगावला.

मार्मिक’ साप्ताहिक चा आज 55 वा वर्धापन दिन सोहऴा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यांनी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. देशात सध्या सर्वत्र बिनकामाच्या चर्चाच सुरू आहेत. कुणीही काहीही बोलतंय पण काहीच करत नाही. जिकडे तिकडे उंटावरुन शेळ्या हाकल्या जात आहे. पण बाळासाहेबांनी कधी उंटावरुन शेळ्‌या हाकल्या नाहीत. मार्मिकमधून त्यांनी सत्यपरिस्थितीचा समाचार घेतला. मराठी माणसाला मुंबई मिळाली नाही तर मराठी माणसाने मुंबई मिळवली असंही उद्धव म्हणाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीकडे आपला मोर्चा वळवला.

दुष्काळाची शरद पवारांना 35 वर्षांनी जाग आली असून पवारांच्या पापांनीच सिंचनाचं मातेरं केलंय. सिंचन घोटाळ्यामुळेच मराठवाड्याची आज ही अवस्था झाली. सिंचनाचे पैसे तुमच्या दिवट्यांनी कसे गिळले आहे त्याचे परिणाम पाहा अशी टीका पवारांनी केली. तसंच  पवार साहेबांना विनंती धरणाच्या आजूबाजूला जाणार असाल तर अजित पवारांना नेऊ नका. हे सगळं पाप तुमच्या नाकर्तेपणाचे आहे असा टोलाही लगावला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या वार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • http://www.ibnlokmat.tv/ Yuvraj

  Udya jevha tarun mandali Aditya Thakrenna target karun Uddhav Thakrenna Hinavtil tevha Uddhavjinna aaple Pittar aathavtil.. Tumhi Balasaheb nahit Pawar saheheban var maryada sodun tika karayla yache krupaya bhaan rakha.

  • Raj

   मला वाटत नाही काही चुकीचे बोलले आहेत.

 • Raj

  @Yuvraj: काय चुकीचे बोलत आहेत???. यांच्या दिवट्यांनी पैसे गिळले म्हणून महाराष्ट्रा वर आज दुष्काळाची वेळ आली आहे……..! तुम्ही पापे करणार आणि ति आम्ही भोगायची….!

close