तब्बल 35 वर्षांनंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

August 14, 2015 10:12 AM0 commentsViews:

sharad pawar4414 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता पुन्हा एकदा राज्यातल्या ग्रामीण भागावर आपलं लक्ष केंद्रीत केलंय. आज (शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शेतकर्‍यांच्या प्रश्नावर उस्मानाबादमध्ये मोर्चा काढणार आहे. तब्बल 35 वर्षांनंतर शरद पवार सरकारच्या विरोधात अशाप्रकारे रस्त्यावर उतरून निदर्शनं करणार आहे. खुद्द शरद पवार मोर्चाचं नेतृत्व करणार असल्यानं या आंदोलनाकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.

शरद पवार शुक्रवारी उस्मानाबादला पोहोचणार आहेत. तिथं शेतकर्‍यांची भेट घेऊन ते शनिवारी लातूर आणि बीड या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. शनिवारी लातूरला राष्ट्रवादीनं दुष्काळ परिषदेचं आयोजन केलंय. उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वाधिक दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्यात. यंदाही पावसाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजा हवालदील झालाय. त्यामुळेच शरद पवारांनी उस्मानाबादची निवड केलीये. पवारांनी या अगोदरही मराठवाड्याचा दौरा केला होता.

मात्र, दुसरीकडे शेतकर्‍यांच्या प्रश्वावरही काँग्रेसने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. उस्मानाबादमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आज मोर्चा काढणार आहे. पण त्याआधीच गुरुवारी काँग्रेस बैलगाडी मोर्चा काढला. पवारांच्या मोर्चाच्या आधी काँग्रेसचा मोर्चा काढला. दुष्काळ जाहीर करा आणि शेतकर्‍यांना मदत करा या मागणीसाठी मधुकर चव्हाण, बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. बाळासाहेबांनी सुरू केलेल्या मार्मिकचा 55 वा वर्धापनदिन सोहळा काल मुंबईत पार पाडला. यावेळी त्यांनी भाजपपेक्षा राष्ट्रवादीलाच लक्ष्य केलं. तुमच्या दिवट्याने कसा पैसा खालला त्यामुळे कसे परिणाम झाले तेही पाहा असा उपरोधी टोला लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close