तुम्ही या चिमुरडीला ओळखता का ?, पुण्यात सोडून गेली आई

August 14, 2015 10:31 AM0 commentsViews:

vandana pune missing girl14 ऑगस्ट : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस सध्या एका चिमुकल्या मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेण्याच्या कामात व्यस्त आहेत. कात्रज पोलीस चौकी जवळील बस्थानाकावर साडे तीन वर्षांच्या मुलीला तिची आई सोडून पळून गेलीये. वंदना दत्ता माने असं या चिमुकल्या मुलीचं नाव आहे.

वंदना तिची आई स्वाती माने सोबत पुण्यात आली होती. मात्र तिच्या आईने तिला एकटीला सोडून पळ काढला. वंदनाच्या जवळ तिचे कपडे आणि खेळणी असलेली पिशवी आढळून आली. वंदना या कंबरेच्या बेल्टवर क्रिश चर्च स्कुल, मुंबई असं लिहिलेलं आहे. मात्र
तिला तिच्या गावाचं नाव माहित नाही. वंदनाचा सांभाळ सध्या पोलीस करत आहेत. वंदना संदर्भात कुणाकडे काही माहिती असल्यास त्यांनी पुणे पोलिसांशी 88 88 250000 आणि 020-24365100 या नंबरवर त्वरित संपर्क साधावा असं आवाहन पुणे पोलिसाच्या वतीने करण्यात आलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close