इचलकरंजीत कापड गोडाऊनला भीषण आग

August 14, 2015 12:35 PM0 commentsViews:

ichalkarangi_fire14 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात एका कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग लागलीय. रात्री अडीच वाजल्यापासून ही आग धगधगतेय. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली. मात्र, कोट्यवधींचं नुकसान झालंय.

वखार भाग परिसरात भिकूलाल मर्दा या कापड व्यापार्‍याचं हे गोडाऊन आहे. आठ तासांहून जास्त झालेत पण आग विझवण्याचे प्रयत्न अजूनही युद्धपातळीवर सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी आहेत. संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालंय. आग इतकी भयानक आहे की गोडाऊनच्या भिंतींनाही तडे गेलेत. सकाळपासून घटनास्थळी क्रेन आणण्यात आली असून आता क्रेनच्या सहाय्यानं आगीवर पाण्याचा मारा केला जातोय. जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधींचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आग मोठी असल्याने आसपासच्या परिसरातही आग पसरण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 तासांमध्ये ही आग आटोक्यात येईल अशी शक्यता आहे. दरम्यान ही आग शॉर्टसर्कीटमुळं लागली असल्याचा अंदाज व्यक्त होतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close