दिल्लीत आंदोलक माजी सैनिकांना पोलिसांकडून धक्काबुक्की

August 14, 2015 1:49 PM0 commentsViews:

one rank on penstion3414 ऑगस्ट : वन रँक वन पेन्शनसाठी दिल्लीत माजी सैनिक आणि लष्करी अधिकारी   जंतरमंतर इथं आंदोलन करतायत. स्वातंत्र्यादिनाच्या पुर्वसंध्येला करण्यात आलेल्या या आंदोलना दरम्यान, माजी सैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी आंदोलनकांना बळजबरीने पोलिसांनी उठवलं. एवढंच नाहीतर त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.

आज सकाळी जेव्हा आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा पोलिसांनी या माजी सैनिकांना आंदोलन स्थळावरून उठायला सांगितलं तेव्हा या आंदोलनकर्त्यांनी नकार दिला. या वृद्ध माजी सैनिकांना फरफटत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिसांच्या दंडेलशाहीमुळे माजी सैनिकांनी संताप व्यक्त केला. आम्ही पुन्हा आंदोलन करू असा पवित्रा माजी सैनिकांनी घेतलाय. काही दिवसांआधी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close