श्वेतपत्रिकेत रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांचा लालूंवर ठपका

December 18, 2009 12:48 PM0 commentsViews: 1

18 डिसेंबर रेल्वेला झालेल्या नफ्यासंदर्भात रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक श्वेतपत्रिका सादर केली आहे. त्यात लालू प्रसाद यादव यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. केंद्रात जेव्हा नरसिंहरावांचं सरकार होतं त्यावेळी सी. के. जाफर शरीफ रेल्वेमंत्री होते. त्यावेळीच रेल्वे फक्त नफ्यात होती. लालू प्रसाद रेल्वेमंत्री असताना त्यांनी नफ्याचा आकडा फुगवून सांगितला अशी टिप्पणीही ममता बॅनर्जी यांनी केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या काळात रेल्वेला 66 हजार 804 कोटींचा नफा झाल्याचा फुगीर आकडा दाखवला होता. पण प्रत्यक्षात तो नफा 17 हजार कोटींचाच होता असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे.

close