मुंबई हायकोर्टाचा राधे माँला दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

August 14, 2015 4:15 PM1 commentViews:

Radhe maa @police stn

14 ऑगस्ट : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँच्या अडचणी वाढल्या असल्या तरी तिला मुंबई हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. हायकोर्टाने राधे माँचा दोन आठवड्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दिंडोशी कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिने आज (शुक्रवारी) हायकोर्टात धाव घेतली होती. या अर्जावर सुनावणी झाली आणि तिला कोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी कांदिवलीतील निक्की गुप्ता या महिलेने सासरच्या सहा जणांविरोधात हुंड्यासाठी छळाची तक्रार केली आहे. राधेमाँ हिच्या सांगण्यावरूनच सासरचे लोक आपला मानसिक छळ करत असल्याचा निक्की यांचा आरोप आहे. निक्की यांच्या तक्रारीवरून राधेमाँसह सातही जणांवर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील पाच आरोपींचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला असून राधे माँ हिला सोमवारी पोलिसांनी समन्स बजावले. त्यानुसार राधे माँला शुक्रवारी कांदिवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाण्यात आलं होते. या पार्श्वभूमीवर, राधे माँने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. कोर्टाने राधे माँचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर चौकशीसाठी हजर राहण्याचा तिचा आज शेवटचा दिवस होता. राधे माँने पोलीस ठाण्यात हजर झाली. राधे माँ कांदिवली पोलिस ठाण्याकडे निघाल्या तेव्हा तिच्या भक्तानी मोठी गर्दी केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • akhtar

    Radhe maa a female version of Asaraam

close