अमरावतीत दलित अत्याचार प्रकरणाची चौकशी होणार

August 14, 2015 7:34 PM0 commentsViews:

sfoasjriojwey

14 ऑगस्ट : अमरावती : दलितांवर होत असलेल्या सामाजिक बहिष्कार प्रकरणी उशिरा का होईना पण सामाजिक न्याय विभागाला आता जाग आली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या प्रकरणाच्या चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त गावात दाखल झाले असून, 17 तारखेला एससी, एसटी आयोगाचे अध्यक्ष या ठिकाणी भेट देणार आहेत. त्याचबरोबर उद्या (शनिवारी) पालकमंत्री गावकर्‍यांची भेट घेणार आहेत.

तुकडोजी महारांजाची जन्मभूमी असलेल्या अमरावतीमध्ये दलितांवर सामाजिक बहिष्काराची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. चिंचोली ब्राम्हणवाडा थडी या गावात माजी सरपंचाने सार्वजनिक जागेवर तारेचं कुपण घातलं. या कुंपणामुळे दलित वस्तीचा रस्ता बंद झाला. या कुंपणाला हरकत घेतल्यामुळे गावकर्‍यांनी दलित कुटुंबीयांवर सामाजिक बहिष्कार टाकला. या घटनेला आज चार दिवस उलटून गेले, पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही. तंटामुक्ती समितीच्या दोन बैठकीतून काहीही निष्पन्न झालं नाही. हे बेकायदेशीर कुंपण हटवायला प्रशासन चालढकल करतंय, असा आरोप आता होत आहे. गावात भेट देण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांना वेळ मिळालेला नाही. दरम्यान, दलित संघटनांनी आता या प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 • अमरावती सामाजिक बहिष्कार – प्रशासन ढिम्म- मंगळवारी बहिष्काराची घटना उजेडात आली
  – दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या गावात भेटी
  – तंटामुक्तीच्या दोन बैठकीत तोडगा नाही
  – माजी सरपंचाचा वादग्रस्त कुंपण काढण्यास नकार
  – जिल्हाधिकारी, एसपींना गावात भेट द्यायला वेळ नाही
  – सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी बेपत्ता
 • सामाजिक बहिष्काराचं कारण काय?- सार्वजनिक जागेवर माजी सरपंचानं घातलं कुंपण
  – कुंपणामुळे दलित वस्तीचा रस्ता बंद
  – कुंपण बेकायदेशीर असल्याचा ग्रामपंचायतीचा निर्वाळा
  – मात्र तरीही कुंपण काढण्यास नकार
  – दलितांवर उर्वरित गावकर्‍यांनी टाकला बहिष्कार
  – दलितांसाठी किराणा, दूध, गहू, चक्की सर्व बंद
  – शेतीच्या कामावर दलितांना घेत नाहीत

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close