राष्ट्रपतींकडून शौर्य पुरस्कार जाहीर

August 14, 2015 10:30 PM0 commentsViews:

AwardsBar

14 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. गुरदासपूर इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एसपी बलजीत सिंग यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याच हल्ल्यात दहशतवाद्यांचा सामना करणारे बलबीर सिंग आणि तारा सिंग यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील 824 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालंय. यामध्ये महाराष्ट्रातील 38 पोलीस जवानांचा समावेश आहे. या 38 पुरस्कांरामध्ये दोन जणांना राष्ट्रपती विशेष शौर्य पुरस्कार आहेत.

त्याचबरोबर मुंबई अग्निशमन दलातील शहीद अधिकारी सुनील नेसरीकर, शहीद नितीन येवलेकर आणि सर्जेराव बंडगर यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा शोर्य पदकांनं गौरवण्यात येणार आहे. तर मुंबई फायर ब्रिगेडच्या 6 जणांना अग्निशमन सेवा शौर्य पुरस्कार जाहीर झालेत. काळबादेवी इथे आग विझवताना तत्कालीन मुख्य अग्निशनम अधिकारी सुनील नेसरीकर यांना वीरमरण आलं होतं. तर लोटस पार्क इमारतीच्या आगीत नितीन येवलेकर यांनी प्राण गमावला होता.

दरम्यान 149 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले असून महाराष्ट्रात 36 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

राष्ट्रपती पोलीस पदक

डॉ. जय जाधव, SP, पुणे ग्रामीण
चंद्रकांत गुंडगे, पोलीस निरीक्षक, ठाणे
मनोहर धनवडे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई
वसंत गवळी, पोलीस उपनिरीक्षक, SRPF
शिवाजी घुगे, PSI, मंत्रालय सुरक्षा
विष्णू मालगावकर, CID
रामचंद्र सावंत, PSI, मुंबई वाहतूक
अन्वर बेग मिर्झा, PSI, नांदेड
बाळासाहेब गवळी, ASI, अंधेरी
विश्वास सोनवणे, ASI, SRPF
रामसरे मिश्रा, ASI, खापरखेडा
बाळासाहेब टोके, ASI, पुणे

मुंबई फायर ब्रिगेडच्या जवानांचा गौरव : राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

शहीद सुनील नेसरीकर
शहीद नितीन येवलेकर
सर्जेराव बंडगर

6 जणांना अग्निशमन सेवा शौर्य पुरस्कार

अमित पडवळ
मनोजकुमार एरांडे
सूर्यकांत पाटील
माणिक ओगले
विश्वनाथ लोट
रॉक्सी फर्नांडीस

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close