राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री

August 15, 2015 10:53 AM0 commentsViews:

CM hsaiorh

15 ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (शनिवारी) मंत्रालय परिसरात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी राज्याच्या मुख्य सचिवांसह अनेक मान्यवरही उपस्थित होते. झेंडावंदन झाल्यानंतर राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जतनेला स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यात दुष्काळाचा मोठा प्रश्न आहे, शेतकर्‍यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं. राज्यातला शेतकरी सक्षम बनवण्याकडे आपला प्रयत्न आहे. शेतकर्‍याला केवळ कर्ज देऊन चालणार नाही, शेतीत गुंतवणूक आणणं महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी सरकारी योजनांच्या माध्यमातून येत्या 5 वर्षात 20 हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा मानस असल्याचंही फडणवीस म्हणाले. शेतकर्‍यांना कर्जाच्या डोंगरातून मुक्त करायचं असल्यासं कर्जाच्या आधारावर शेतीची अर्थव्यवस्था नको असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. तसंच थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनले आहे. 8 महिन्यात 70 हजार कोटींची गुंतवणूक येतेय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची आता आपल्या सर्वांची जबाबदारी, तोवर आमचे स्वप्न पूर्ण होणार नाही : मुख्यमंत्री
  • शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीमुळे खूप कष्ट झेलावे लागले. शेतीचा शाश्वत विकास करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे : मुख्यमंत्री
  • जलयुक्त शिवारची योजना त्यासाठीच, 300 कोटी रूपये जनतेने उभे केले, ही योजना राज्य सरकारची नाही तर जनआंदोलन बनली याचा आनंद : मुख्यमंत्री
  • 25 हजार गावांत दुष्काळ असताना 7000 कोटींपेक्षा अधिक रक्कम राज्य सरकारने दिली : मुख्यमंत्री
  • कर्जावर आधारित नाही, तर गुंतवणुकीवर आधारित शेती याला राज्य सरकारचे प्राधान्य, त्यातूनच शेतकरी समृद्ध होणार : मुख्यमंत्री
  • दीड लाख शेततळी, एक लाख विहिरी तयार करणार, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात सिंचनाच्या अनेक सोयी करणार : मुख्यमंत्री
  • 22 लाख शेतकर्‍यांना अन्नसुरक्षा,3 रूपयात तांदूळ, 2 रूपयात गहू. आरोग्य सेवा देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्याप्तीवाढ: मुख्यमंत्री
  • 2016 पर्यंत मागेल त्या शेतकर्‍यांला विजेचे कनेक्शन देणार, मागास भागात 40 हजार वीज कनेक्शन दिले : मुख्यमंत्री
  • गतिमान शासनासोबत पारदर्शितेसाठी सेवा हमी विधेयक पारित, सेवा मिळविणे हा जनतेचा अधिकार, सेवा देणे ही सरकारची जबाबदारी : मुख्यमंत्री
  • सेवा हमी पारित केल्याबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे अभिनंदन करतो. आता संपूर्ण सेवा संचालनालय तयार करतो आहे : मुख्यमंत्री
  • नवे खरेदी धोरण तयार केले आहे. तीन लाखाच्या वरच्या सर्व वस्तु ई-टेडरिंगच्या माध्यमातून, पारदर्शिता येणार, भ्रष्टाचार कमी होणार: मुख्यमंत्री
  • महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती होते आहे. उद्योगातील सरलता, कायद्यातील बदल, परवानाराज संपविला यातून मोठी गुंतवणूक येते आहे : मुख्यमंत्री
  • थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनले आहे. 8 महिन्यात 70 हजार कोटींची गुंतवणूक येतेय्, हे सांगताना आनंद होतो : मुख्यमंत्री
  • शिक्षणाचा गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न, शिक्षण शुल्क विधेयकाच्या माध्यमातून नफेखोरी करणार्‍या महाविद्यालयांना चाप बसणार : मुख्यमंत्री
  • सिद्धपराध दर आठ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता, तो 32 टक्क्यांपर्यंत आणण्यात यश आले. कायदा-सुव्यवस्थेमुळे गुंतवणूक येतेय : मुख्यमंत्री
  • नागपूर-मुंबई सुपरएक्सप्रेस-वेमुळे कम्युनिकेशन्स क्षेत्रात मोठी क्रांती होणार, राज्यांतर्गत रस्त्यांवरही तितकाच भर : मुख्यमंत्री
  • दरवर्षी 25 हजार आदिवासी विद्यार्थी नामांकित शाळेत शिकणार, 18 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले : मुख्यमंत्री
  • इंदूमिल स्मारकासाठी जागा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार : मुख्यमंत्री
  • आव्हानं मोठी आहेत, पण, आपण सारे एकजूट होऊन याचा मुकाबला करू, सर्वांची साथ मिळेलच : मुख्यमंत्री

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close