वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी यवतमाळ बंद

December 19, 2009 9:53 AM0 commentsViews: 5

19 डिसेंबर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी शनिवारी यवतमाळ बंद पाळण्यात आला. माजी खासदार आणि स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते जाबुवंतराव धोटे यांनी हा बंद पुकारला होता. यवतमाळमध्ये या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा, शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्यात आले होते. वेगळ्या तेलंगणाच्या मागणीनंतर आता वेगळ्या विदर्भाची मागणीही जोर धरू लागली आहे.

close